महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू; नुकसान भरपाई देण्यासाठी राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र - केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन

केरळमधीस वायनाड जिल्ह्यातील सुलतान बेथरी येथील एका शाळेत सर्पदंश झाल्याने एका 10 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये शाळेत सर्पदंशाने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू,

By

Published : Nov 21, 2019, 10:21 PM IST

तिरुवनंतपुरम - केरळमधीस वायनाड जिल्ह्यातील सुलतान बेथरी येथील एका शाळेत सर्पदंशाने एका 10 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शाळेच्या प्रशासनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना पत्र पाठवले आहे.


एस. शेहला असे सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. विद्यार्थ्यांचा वर्ग चालू होता. शिक्षक मुलांना शिकवत होते. त्याचवेळी शेहलाला सर्पदंश झाला. या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत शिकवणे सुरुच ठेवले. त्यानंतर शेहलाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उशीर झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल गांधी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेहलाच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी विनंती केली आहे.


शाळेतच सर्पदंश होऊन मुलगी मृत पावल्याच्या घटनेने परिसरातएकच खळबळ उडाली आहे. वर्गामध्ये एका ठिकाणी मोठे छिद्र होते. या छिद्रातूनच साप आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शाळा प्रशासनावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे केरळचे शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details