नवी दिल्ली - नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर चर्चा केली. यावेळी बॅनर्जी यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितले.
काय म्हणाजे अभिजित बॅनर्जी ?
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत 'डायरेक्ट मनी ट्रान्स्फर' म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठविणे फक्त गरीबांपुरते मर्यादित नको. त्यापेक्षाही जास्त लोकसंख्येच्या खात्यात थेट पैस पाठवायला हवे, असे बॅनर्जी म्हणाले.
मोठे आर्थिक पॅकेज देण्याची गरज
अभिजीत बॅनर्जी आणि राहुल गांधी चर्चा कोरोनामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी मोठे आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. अमेरिकेने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जाहीर केली आहे.
- बाजारातली वस्तूंची मागणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील ६० टक्के जनतेला जास्त पैसे दिलेतरी काही वाईट घडणार नाही. नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात रेशन कार्डचं वाटप करा. त्याद्वारे नागरिकांना पैशासह गहू, तांदुळही द्या.
आधार कार्ड आधारीत सार्वजनिक अन्यधान्य पुरवठा केला जावा
अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आधार कार्ड आधारित सार्वजनिक अन्नधान्य पुरवठा करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरविण्याची व्यवस्था नसल्याने अनेक स्थलांतरीत कामगारांना फायदे मिळत नाहीत.
- स्थलांतरीत कामगारांना घरी पाठविण्याआधी त्यांची तपासणी करणे हा काळजीचा विषय आहे. केंद्र सरकारने हे काम करावे.
- लॉकडाऊन नंतरच्या काळात अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, याबाबत आपण सर्वांनी सकारात्मक असायला हवे. लॉकडाऊन उठविण्यापूर्वी कोरोनाची स्थिती काय आहे, हे आपण नीट जाणून घेतले पाहिजे.