महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिक्षकदिनी राहुल गांधीचा ट्रोलर्सना टोमणा, म्हणाले... - शिक्षकदिनी राहुल गांधीचा ट्रोलर्सना टोमणा

शिक्षक दिनानिम्मित्त राहुल  यांनी या सर्व ट्रोलर्स आणि विरोधकांचा समाचार घेतला आहे.

शिक्षकदिनी राहुल गांधीचा ट्रोलर्सना टोमणा

By

Published : Sep 6, 2019, 2:41 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नेहमची चर्चेत असतात. राहुल गांधींना त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावरून नेटेकरी, माध्यमे आणि विरोधक ट्रोल करतात. गुरवारी शिक्षक दिनानिमित्त राहुल यांनी या सर्व ट्रोलर्स आणि विरोधकांचा समाचार घेतला आहे. तुमच्या टीकांमुळेच मी कणखर बनत गेलो, त्यामुळे तुमचे आभार असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

'आज शिक्षक दिन आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून मला शिकायला मिळाले त्या सर्वांचे आभार. यामध्ये सोशल मीडिया ट्रोलर्स, पूर्वग्रहदुषित पत्रकार, माझे राजकीय विरोधक यांच्या द्वेषपूर्ण खोट्या प्रचाराने मला कणखर बनवले, त्यामुळे सर्वाचे आभार', असा टोमणा राहुल गांधींनी विरोधकांना लगावला आहे. राहुल गांधी हे देशातील अशा राजकारण्यांमध्ये आहेत. ज्यांना बर्‍याचदा ट्रोलचा सामना करावा लागतो. ते राजकारण असो की निवडणुकीतील भाषण असो किंवा इतर कोणताही प्रसंग असो त्यांना ट्रोल केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details