नवी दिल्ली - कृषी कायद्यासंदर्भात आज काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांची स्वाक्षरी असलेलं निवेदन दिलं. तसेच त्यांनी राष्ट्रपतींना संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून नवीन कायदे मागे घेण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले. यावेळी त्यांनी चीन, कोरोना आणि कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
कोरोनाला केंद्र सरकारने गांभीर्यांने घ्याव. वेळीच पाऊल उचललं तर आणखी लोकांना जीव गमवावा लागणार नाही. कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होत. मात्र, पण कोणी ऐकलं नाही आणि खिल्ली उडवली. मात्र, मी आज पुन्हा सांगत आहे. शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
मोदी चीनवर काहीच बोलत नाहीत -
नरेंद्र मोदी फक्त गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याच काम करत आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे, अशी टीका राहुल गांदी यांनी केली. तसेच त्यांनी चीनवरून मोदींवर निशाणा साधला. चीनने भारताची हजारो किलोमीटर जमीन अनधिकृतरीत्या बळकावली आहे. त्यावर मोदी काहीच का बोलत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.
संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून कायदे मागे घ्या -
शेती कायदे रद्द करेपर्यंत शेतकरी घरी परत जाणार नाहीत. सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून हे कायदे मागे घ्यावेत. विरोधी पक्ष शेतकरी व मजुरांच्या पाठीशी उभे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. शेतकरी या कायद्यांच्या विरोधात उभे आहेत, हे जनता पाहत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.