अमेठी - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीतून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या. अर्ज भरण्याआधी राहुल आणि प्रियंका काँग्रेसच्या रॅलीत सहभागी झाले होते. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पाचव्या टप्प्यासाठी १० एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १८ एप्रिलपर्यंत एप्रिल चालू राहील. राहुल गांधी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अमेठीत राहुल गांधींचे जोरदार शक्तीप्रदर्शन, सोनिया-प्रियांकांची उपस्थिती, उमेदवारी अर्ज दाखल
पहिल्याच दिवशी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होत्या.
राहुल गांधी, प्रियांका गांधी रॅली
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी आजपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारासह फक्त ४ जणच प्रवेश करू शकतील. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत चालेल. नामांकन प्रक्रियेदरम्यान शांतता राखण्यासाठी येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाकडे वळवण्यात येईल.
Last Updated : Apr 10, 2019, 2:54 PM IST