महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधी आज वायनाडमधून भरणार उमेदवारी अर्ज, शक्तिप्रदर्शन करणार - file

राहुल गांधी हे अमेठीसोबतच वायनाड येथूनही लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. अर्ज भरण्याची सर्व तयारी करण्यात आली असून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

राहुल गांधी

By

Published : Apr 4, 2019, 8:31 AM IST

वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गुरुवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राहुल गांधी हे अमेठीसोबतच वायनाड येथूनही लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. अर्ज भरण्याची सर्व तयारी करण्यात आली असून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

राहुल गांधी हे बुधवारी रात्री कोझीकेड येथे दाखल झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता कालपेट्टा येथील विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. कालपेट्टा येथे रोड शोद्वारे ते आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यादेखील राहुल गांधी यांच्या सोबत उपस्थित असण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details