चैन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुका यंदा पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱयावर आहेत. राज्यात विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे ते भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. रविवारी राहुल गांधींनी एका सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपावर जोरदार टीका केली. नागपूरचे 'निकरवाले' ( आरएसएस पोषाखावरून टीका ) तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही. तामिळनाडूचे भविष्य फक्त राज्यातील तरुण आणि लोकचं ठरवू शकतात, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समजू शकत नाहीयेत की, तामिळनाडूचे भविष्य हे फक्त तामिळानाडूचे लोकचं ठरवू शकतात. तामिळ नागरिकांना मदत करण्यासाठीच मी येथे आलो आहे. नागपूरचे निकरवाले तामिळनाडूचे भविष्य ठरवू शकत नाहीत. तामिळनाडूमध्ये त्यांनी कितीही परेड घेतल्या तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही, असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरूनही मोदींवर निशाणा साधला. मोदींनी यांनी लागू केलेले शेतकरी कायदे हे शेतकरी आणि कामगारविरोधी आहेत. मी मोदींना देशाचा भारताचा पाय नष्ट करू देणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी चीनवरून मोदींवर निशाणा साधला. चीनने भारताची जमीन बळकावली आहे. मात्र, यावर मोदींनी मौन बाळगलयं, असे ते म्हणाले.