नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी देशातील विविध मुद्यांवरून मोदींवर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने कोरोना काळात केलेली आश्वासने फक्त 'खयाली पुलाव' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
'कोरोना काळातील मोदींची आश्वासने म्हणजे खयाली पुलाव' - राहुल गांधींचे लेटेस्ट टि्वट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने कोरोना काळात केलेली आश्वासने फक्त 'खयाली पुलाव' असल्याची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.
'21 दिवसांमध्ये कोरोना संकटावर मात करणार, आरोग्य सेतू अॅपमुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर होण्याचा संकल्प, सीमेवर कोणीही घुसखोरी केलेली नाही, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच राहुल गांधींनी पंतप्रधान सहाय्यता निधीवरूनही मोदींना लक्ष्य केले.
गेल्या काही आठवड्यांपासून राहुल गांधी देशाची अर्थव्यवस्था, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अमेरिका-चीनमधील तणावाच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधींनी घसरलेल्या जीडीपीवरून मोदींवर टीका केली होती. मोदी सरकारकडून कोरोना महामारीचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत.