नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले असून विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयकावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
'नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे ईशान्य भारतामधील जीवनशैलीवर हल्ला' - नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक
नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले असून विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे.
ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करण हा तेथील विचार आणि जीवनशैलीवर हल्ला आहे. मी ईशान्य भारतामधील लोकांसोबत असून त्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
यापुर्वी राहुल गांधी यांनी या विधेयकाला पाठिंबा देणारे देशाचा पाया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली होती. ईशान्य भारतामधील विद्यार्थी संघटना आणि लोकांनी या विधेयकाचा निषेध केला आहे. नॉर्थ ईस्ट विद्यार्थी संघटनेने (NESO) ईशान्येकडील राज्यांत या विधेयकाविरोधात १२ तासांच्या बंदची घोषणा केली आहे.