'आसामला भाजप आणि 'आरएसएस'च्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही' - Rahul Gandhi hit out at bjp
आसामला नागपूर आरएसएसचे चड्डीवाले नाही चालवणार, आसामला फक्त आसामची जनता चालवणार, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर केला.
!['आसामला भाजप आणि 'आरएसएस'च्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही' 'आसामला भाजप आणि आरएसएसच्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5521439-1050-5521439-1577530606857.jpg)
'आसामला भाजप आणि आरएसएसच्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही'
गुवाहटी - आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आरएसएसचे चड्डीवाले नाही चालवणार, आसामला फक्त आसामची जनता चालवणार, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर केला. गुवाहटीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेचा सामना फक्त चीन किंवा भारत करू शकतो. मात्र, मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. भारतामध्ये बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान मोदी द्वेष पसरवत आहेत. मात्र, राग आणि द्वेषाने आसामचा विकास होणार नाही. या कठीण प्रसंगी आम्ही जनतेसोबत आहोत. आसाममध्ये तरुण नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत असून इतर राज्यांमध्ये देखील विरोध होत आहे. मात्र, भाजप तरुणांवर हल्ले करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.