नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामाजिक आरोग्य कार्यकर्ते, परिचारिका आणि मिडवाइव्ज, अंगणवाडी सेविका यांचे कौतुक केले आहे. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीशी लढताना हे सर्व महत्त्वाची भूमिका निभावत आहेत, असे राहुल यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणातही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी हे सर्व जण काम करत असल्याचे ते म्हणाले.
अंगणवाडी सेविका, परिचारिका हेच खरे देशभक्त - राहुल गांधी - Anganwadi workers
अंगणवाडी सेविका, परिचारिका आणि मिडवाइव्ज स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करत आहेत. हीच खरी देशभक्ती आहे. देश म्हणून आपण या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ऋणी आहोत. आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
'अंगणवाडी सेविका, परिचारिका आणि मिडवाइव्ज स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करत आहेत. हीच खरी देशभक्ती असून आत्ता सर्वांनीच अशाप्रकारे काम करण्याची गरज आहे. हे सर्वजण पडद्यामागचे नायक-नायिका आहेत आणि अथकपणे काम करत आहेत,' असे राहुल म्हणाले
'देश म्हणून आपण या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ऋणी आहोत. आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कोरोनामुळे पसरलेल्या महामारीचा धोका टळेल, तेव्हा या सर्व सेवक सेविकांना त्यांच्या अतुलनीय कार्याचा योग्य मोबदला मिळावा अशी आशा करतो. या सर्वांना मी सलाम करतो आणि ते त्यांचे कुटुंबीय आणि आपला देश या महामारी पासून सुरक्षित राहो, अशी प्रार्थना करतो,' असे राहुल म्हणाले.