महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाटण्यातील एका छोट्या हॉटेलमध्ये जेवले राहुल गांधी , पाहा VIDEO - patna

राहुल गांधी यांनी पाटणा शहरातील एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवन केले आहे.

राहुल गांधी

By

Published : Jul 7, 2019, 1:12 PM IST

पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सुणावणीसाठी राहुल गांधी पाटणा येथे गेले होते. यावेळी राहुल गांधी यांनी शहरातील एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवन केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


पाटणा न्यायालयामधून निघाल्यानंतर राहुल गांधी हे मोर्य येथील बंसत विहार या हॉटेलमध्ये गेले. यावेळी त्यांनी हॉटेलमधील डोसा आणि कॉफी घेतली. राहुल गांधींसोबत शक्ति सिंह गोहील, अखिलेश सिंह आणि प्रेमचंद्र मिश्रा हे नेते उपस्थित होते. राहुल गांधीनी हॉटेलमध्ये आलेल्या लहाणमुलासोबत गप्पादेखील मारल्या. दरम्यान हॉटेलमधील उपस्थित लोकांनी त्यांचे छायाचित्र घेतले. यानंतर ते सर्वांना अभिवादन करून विमानतळाकडे रवाना झाले.


राहुल गांधी यांनी कोलार, कर्नाटक येथे प्रचारादरम्यान सर्व घोटाळेबाजांची नावे मोदीच असतात, अशी टिप्पणी केली होती. यावर सुशीलकुमार मोदी यांनी एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात पाटणा येथील न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. सुशीलकुमार मोदींनी दाखल केलेल्या गुन्हाप्रकरणी राहुल गांधी शनिवारी न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने याप्रकरणी राहुल यांना जामीन मंजूर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details