पटना - बिहारमध्ये पावसाने थैमान घातले असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध घटनेत आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर राहुल गांधी यांनी टि्वट केले असून काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांची मदत करण्यास सांगितले आहे.
बिहारमध्ये पावसाचे थैमान, राहुल गांधीचे कार्यकर्त्यांना लोकांची मदत करण्याचे आवाहन - Rahul Gandhi requested Congress Party workers immediately join help of bihar flood victim
बिहारमध्ये पावसाने थैमान घातले असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बिहारमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. यामध्ये जीव गमवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती मला सहानुभूती आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांची मदत करण्याचे आवाहन करतो, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
राज्यात १९ एनडीआरएफ पथकांसह इतर बचाव पथकांच्याद्वारे बचावकार्य सुरू आहे. रविवारी पटनामधील सखल भागात अडकून पडलेल्या २३५ लोकांना एनडीआरएफद्वारे सुरक्षितस्थळी दाखल करण्यात आले. तसेच बिहारमधील इतर भागांमधून ४९४५ लोकांना ४५ जनावरांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.