महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पक्ष चालवता येत नसल्यामुळे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे - शिवराज सिंह चौहान - तेलंगणा

काँग्रेस हा नकली गांधींचा पक्ष आहे. यामुळेच सर्व राज्यात जनता त्यांना नाकारत आहे. राहुल गांधींना काँग्रेस चालवणे जमत नाही. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हायला पाहिजे.

शिवराज सिंह चौहान

By

Published : Jul 14, 2019, 7:13 PM IST

विजयवाडा -भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी भाजपच्या सदस्य जोडणी अभियानादरम्यान राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. चौहान म्हणाले, पक्ष चालवता येत नसल्यामुळे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे. राहुल गांधी काँग्रेस चालवण्यास असमर्थ आहेत.

भाजपच्य सदस्य जोडणी अभियानासाठी शिवराज सिंह चौहान यांनी विजयवाडाला भेट दिली. चौहान म्हणाले, काँग्रेस हा नकली गांधींचा पक्ष आहे. यामुळेच सर्व राज्यात जनता त्यांना नाकारत आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप अनेक राज्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष बनला आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेस 'झीरो' झाली आहे. तेलुगु देसम पक्षही त्याच मार्गावर आहे. राहुल गांधी यांना काँग्रेस चालवणे जमत नाही. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हायला पाहिजे. राहुल गांधी यांनी पायउतार झाल्यानंतर आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काँग्रेस अध्यक्षांनीही राजीनामा दिला पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details