नवी दिल्ली - रविवारी ५ एप्रिलला म्हणेजच आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावून सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कोरोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे. मात्र, यावर विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. 'टाळी वाजवून अन् दिवे लावून समस्या सुटणार नाही', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
भारतामध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी रुग्णांची चाचणी मोठ्या प्रमाणात घेण्यात येत नाही. आकाशात टार्च चमकवल्याने, दिवे लावल्याने किंवा टाळ्या वाजवल्याने या समस्येचे निराकारण होणार नाही, असे राहुल गांधींनी टि्ेवटमध्ये म्हटले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन चाचण्या वाढवायला हव्यात अशी सूचना त्यांनी या टि्वटमधून केली आहे.
राहुल गांधी यांनी जगातील कोरोनाचा प्रसार झालेल्या देशातील कोरोना चाचणी संबधित डेटा असलेला आलेख शेअर केला आहे. यामध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तान, श्रीलंका, अमेरिका, जर्मनी, इटली, साऊथ कोरिया या देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसत आहे. भारतामध्ये चाचण्या इतक्या कमी प्रमाणात का होत आहेत. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनाग्रस्तांची चिंताच नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. ' 5 एप्रिलला सर्वांनी रात्री 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून घरातील दारासमोर, गँलरीमध्ये मेणबत्ती, दिवा, बँटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट सुरू ठेवा. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करू, असे अवाहन मोदींनी केले आहे.