नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून मोदींवर पलटवार केला. 'देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱ्यांची आहे. याबाबत आम्ही पंतप्रधानांना विचारले. मात्र, ते यावर एक शब्द ही बोलले नाहीत. तसेच अर्थमंत्र्यांनी देखील आपल्या लांबलचक भाषणात बेरोजगारीचा उल्लेख केला नाही', असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून विचलीत करत आहेत मोदी हे काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान याबाबत बोलतात. मात्र, ते कधीच मुळ मुद्यांवर बोलत नाहीत. देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱ्यांची आहे. देशातील प्रत्येक तरुणाला शिक्षणानंतर नोकरी हवी आहे. मोदींनी सांगायला हवे की, त्यांनी युवकांसाठी काय केले, असे राहुल गांधी म्हणाले.