जैसलमेर - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आजपासून राजस्थानमधील जैसलमेर येथेतीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते खासगी विमानाने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ जैसलमेर येथे पोहोचतील. त्यांचा हा खासगी दौरा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ सुरक्षा पथक जैसलमेर येथे पोहोचले आहे. त्यांची ही भेट अत्यंत गोपनीय ठेवली जात आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्याची काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने पुष्टी केली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींचा जैसलमेरला बुधवारी वैयक्तिक भेट देणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनही त्यांच्या वतीने तयारी करत आहे. राहुल गांधी हॉटेल सूर्यगढ येथे थांबणार असून हॉटलेमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.