तिरुवनंतपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या राजकीय कारकीर्द तारणाऱ्या केरळातील वायनाड मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सेवानिवृत्त नर्स राजम्मा यांची भेट घेतली. राजम्मा या राहुल यांच्या जन्मावेळी दिल्लीतील रुग्णालयात कार्यरत होत्या. ४९ वर्षांपूर्वी त्यांनी राहुल गांधींच्या जन्मानंतर त्यांना मांडीवर खेळवले होते.
वायनाड दौऱ्यात राहुल गांधींनी घेतली मांडीवर खेळवणाऱ्या नर्स राजम्माची भेट - wayanad
७२ वर्षीय राजम्मा सेवानिवृत्त नर्स आहेत. ४९ वर्षांपूर्वी १९ जून १९७० मध्ये दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात राहुल गांधींचा जन्म झाला होता. तेव्हा राजम्मा प्रशिक्षणार्थी नर्स होत्या. राहुल यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले तेव्हा त्या रूग्णालयातच उपस्थित होत्या, राजम्मा यांनी म्हटले होते.
रविवारी वायनाड दौऱ्याच्या अंतिम दिवशी राहुल यांनी कोझीकोड येथे रोड शो केला. याआधी त्यांनी जन्मानंतर मांडीवर खेळवणाऱ्या नर्स राजम्मा यांची भेट घेतली. ७२ वर्षीय राजम्मा सेवानिवृत्त नर्स आहेत. राहुल यांनी राजम्मा यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. १९ जून १९७० मध्ये दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात राहुल गांधींचा जन्म झाला होता. तेव्हा राजम्मा प्रशिक्षणार्थी नर्स होत्या. राजम्मा यांनी राहुल यांना फणसाचे चिप्स आणि मिठाई भेट दिली. हे पदार्थ त्यांनी राहुल यांच्यासाठी स्वतः बनवून आणले होते. राहुल यांनी राजम्मा यांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी राहुल काहीसे भावुकही झाले होते. त्यांनी राजम्मांना प्रेमाने अलिंगन दिले शिवाय या खास भेटीचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवर देखील शेअर केले. राहुल गांधी जेव्हा वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा राजम्मांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'मी त्यांच्या जन्माची साक्षीदार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नातवाला पाहून आम्ही भारावून गेलो होतो.'
लोकसभा निवडणूक काळात जेव्हा राहुल यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले तेव्हा ७२ वर्षीय राजम्माने म्हटले होते की, राहुल यांच्या नागरिकत्वाबाबत संशय घेतला जाऊ नये. कारण १९ जून १९७० रोजी जेव्हा दिल्लीतील होली फॅमिली रूग्णालयात राहुल यांचा जन्म झाला तेव्हा त्या रूग्णालयातच उपस्थित होत्या. त्यांनी हे देखील सांगितले की रूग्णालयात अजूनही सर्व माहिती उपलब्ध असायला हवी.