महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू; राहुल गांधींनी घेतली कुटुंबीयांची भेट - केरळमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Dec 6, 2019, 3:48 PM IST

वायनाड - काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्ह्यातील सुलतान बेथरी येथील एका शाळेत सर्पदंशाने एका 10 वर्षीय विद्यार्थिनीचा 20 नोव्हेंबरला मृत्यू झाला होता.


एस. शेहला असे सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. विद्यार्थ्यांचा वर्ग चालू होता. शिक्षक मुलांना शिकवत होते. त्याचवेळी शेहलाला सर्पदंश झाला. या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत शिकवणे सुरूच ठेवले. त्यानंतर शेहलाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उशीर झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेहलाच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी विनंती केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details