नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्थलांतरित मजुरांचे मृत्यू व रोजगाराचे कमी झालेले प्रमाण यांचा सरकारवर काहीच परिणाम झाला नसल्याची त्यांनी टीका केली आहे.
टाळेबंदीतील स्थलांतिरत मजुरांच्या मृत्युची आणि गमाविलेल्या रोजगाराची आकडेवारी नसल्याचे लेखी उत्तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिले आहे. जर सरकारकडे आकडेवारी नसेल तर कोरोनाच्या संकटात टाळेबंदी लागू केल्यानंतर स्थलांतरित मजुरांचे मृत्यू झाले नाहीत का? अशी घणाघाती टीका केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली आहे.