नवी दिल्ली- भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 ऑगस्टला 20 लाखांपेक्षा जास्त असेल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रसार रोखण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 14 जुलै रोजी राहुल गांधींनी या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 10 लाखांचा टप्पा गाठेल, असे ट्विट केले होते.
' 10 ऑगस्टला भारतात 20 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित असतील' - कोरोना वायरस लेटेस्ट न्यूज
कोरोना रुग्णसंख्येने सध्या 10 लाखांचा टप्पा पार केला आहे.रुग्ण वाढीचा वेग असाच राहिला तर 10 ऑगस्टला देशात 20 लाख रुग्ण असतील, असा इशारा गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी 14 जुलै रोजी ट्विट करत या आठवड्यात रुग्णसंख्या 10 लाखांचा टप्पा पूर्ण करेल, असे म्हटले होते.
राहुल गांधी
कोरोना रुग्णसंख्येने सध्या 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्ण वाढीचा वेग असाच राहिला तर 10 ऑगस्टला देशात 20 लाख रुग्ण असतील, असा इशारा गांधी यांनी दिला. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सरकारने नियोजनपूर्वक प्रयत्न करणे गरेजेचे असल्याचे त्यांनी ट्विट केले.
गुरुवारी भारतात 32 हजार 695 रुग्ण वाढले तर 606 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 3 लाख 31 हजार 146 रुग्णांवर उपचार सुरु असून 6 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत.