नवी दिल्ली - मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. या सत्ता पेचाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टि्वटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
'काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या नादात पेट्रोलचे भाव कमी करायला विसरू नका' - मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य
मध्यप्रदेश सत्ता पेचाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टि्वटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
!['काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या नादात पेट्रोलचे भाव कमी करायला विसरू नका' rahul gandhi hits out pm modi over MP Political Crisis](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6367501-616-6367501-1583909886988.jpg)
'सध्या काँग्रेसचे निवडूण आलेले सरकार पाडण्यात तुम्ही व्यग्र आहात. अशामध्ये कदाचीत जागतिक स्तरावर 35 टक्के घसरलेल्या तेलाच्या किंमतीवर तुमचे लक्ष नसेल. कृपया तुम्ही पेट्रोलचे दर ६० रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करून देशातील नागिरकांना याचा लाभ देऊ शकता का? त्यामुळे ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर येण्यास मदत होईल', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
दरम्यान खनिज तेलाचे दर जागतिक बाजारात 35 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशात खनिज तेलाची मागणी घटली असतानाही प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने जून २०१७ नंतर दराचा निचांक गाठला आहे.