नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय जवानांना जीव गमवावा लागला होता. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका असून आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे. त्यावरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला आणि हल्ल्याच्या चौकशीमधून काय माहिती मिळाली?, असे सवाल राहुल गांधींनी टि्वट करुन उपस्थित केले आहेत.
पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 40 जवानांची आज आपण आठवण काढत आहोत. त्यामुळे याप्रकरणी काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला?, हल्ल्याच्या चौकशीचा काय निकाल आहे?, सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी भाजप सरकारने कोणाला जबाबदार ठरवले?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये केले आहेत.