कोरेगाव भीमा हे तर संघर्षाचे प्रतिक, राहूल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Bhima Koregaon
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.जो कोणी मोदी आणि शाह यांच्या अजेंड्याचा विरोध करतो. त्याला शहरी नक्षलवादी करार दिला जात आहे, असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी
नवी दिल्ली -कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी आता राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीकडे सोपवली आहे. त्यावरून काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरगाव भीमा हे संघर्षाचे प्रतीक असून सरकारच्या हातातील कठपुतळी बनलेल्या तपास यंत्रणा ते मिटवू शकणार नाहीत, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवातही केली. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास आता एनआयएकडे दिला आहे. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारमध्ये संघर्षाला तोंड फुटले आहे.
काय आहे प्रकरण -
2017 मध्ये पुण्यात कोरेगाव भीमाच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना देशभरातील अनेक डावे, पुरोगामी कार्यकत्रे आणि विचारवंत नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. यात आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, अरुण फरेरा, शोमा सेन, व्हर्नन गोन्सालवीस, गौतम नवलखा आणि वरवरा राव यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते.