वायनाड - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'देशामध्ये हिंसा वाढत आहे. देशाची सुत्रे ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहेत. ती व्यक्ती हिंसेवर विश्वास ठेवते. त्यामुळे इतर लोकही कायदा आपल्या हातामध्ये घेत आहेत', अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी मोदींवर केली. राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर असून सुलतान बेथरी येथे बोलत होते.
राहुल गांधींचा मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा, म्हणाले... 'त्यांचा हिंसेवर विश्वास'
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात हिंसा वाढली असून अराजकता पसरली आहे. महिला सुरक्षीत नसून अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पसंख्याक समाजाविरोधात हिंसा होत असून त्यांच्याविरुद्ध घृणा पसरवली जात आहे. तसेच आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. जी व्यक्ती हा देश चालवत आहे. त्या व्यक्तीचाच हिंसेमध्ये विश्वास असल्यामुळे देशात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे राहुल म्हणाले.
आज उन्नाव अत्याचार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला. त्यावर राहुल गांधी यांनी टि्वट करून दु:ख व्यक्त केले आहे. निष्पाप मुलीचा दुःखद मृत्यू ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. देशाची पुन्हा एका मुलीने न्याय मिळले या आशेत अखेरचा श्वास घेतला, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.