नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. प्रदर्शनाला पाठिंबा देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकाराला ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्याचा आणि शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा अधिकार नाही, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
'सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही', राहुल गांधींची टीका - impose Section144
देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. प्रदर्शनाला पाठिंबा देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी
नागरिकात सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच दिल्लीमधील 15 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती.
हेही वाचा -'आंदोलकाचा आवाज जितका दाबाल तितकाच तो मोठा होत जाईल', प्रियंका गांधींचे टि्वट