नवी दिल्ली - भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजून सुरूच आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चीनने आपली जमीन बळकावली, हे भारत सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) घडू दिले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
मोहन भागवतांना सत्य माहीत आहे, पण.. चीनबाबतच्या वकत्व्यावरून राहुल गांधींची टीका - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपूरमध्ये पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत कोरोना, चीन आणि हिंदुत्त्व अशा विविध विषयांवर बोलले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी टि्वट करून त्यांच्यावर निशाणा साधला.
'मोहन भागवत यांनाही सत्य माहिती आहे. मात्र, त्याचा सामना करण्यास ते घाबरत आहेत. सत्य हे आहे की, चीनने आपली जमीन ताब्यात घेतली. भारत सरकारने आणि आरएसएसने हे घडू दिले, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपूरमध्ये पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत कोरोना, चीन आणि हिंदुत्त्व अशा विविध विषयांवर बोलले. चीनच्या तुलनेत आपण आपले लष्करी बळ अधिक वाढवणे गरजेचे आहे. चीनचा विस्तारवादी चेहरा सर्व जगासमोर अधिक स्पष्टपणे आला आहे. तैवान, भारत, अमेरिका, जपान, भूतान अशा अनेक देशांविरोधात चीनने एकत्रपणे कटुता घेतली आहे, असे मोहन भागवत म्हणाले.