अहमदाबाद - राहुल गांधी यांचा अहमदाबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी आज शुक्रवारी मानहाणी खटल्याप्रकरणी अहमदाबाद न्यायालयासमोर हजर राहिले होते. न्यायालयाने त्यांना 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
मानहानी प्रकरणी जामीन मंजूर; ..त्यामुळे राहुल गांधींनी मानले भाजप व आरएसएसचे आभार - criminal defamation s
राहुल गांधी यांचा अहमदाबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
![मानहानी प्रकरणी जामीन मंजूर; ..त्यामुळे राहुल गांधींनी मानले भाजप व आरएसएसचे आभार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3819803-thumbnail-3x2-rahul.jpg)
दरम्यान भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खटला दाखल केल्यामुळे राहुल गांधी यांनी भाजपचे आभर मानले आहेत. 'खटला दाखल केल्यामुळे माझी वैचारिक लढाई जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी मला संधी दिली आहे', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील स्थानिक न्यायलयात हजेरी लावली. नोटबंदीदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष अजय पटेल यांनी त्यांच्याविरोधात मानहाणी खटला दाखल केला होता. नोटाबंदी दरम्यान राहुल यांनी सहकारी बँकेवर 745 कोटी रूपयांचे काळे धन पांढरे केल्याचा आरोप केला होता, असे अजय यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.