राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत आहेत. यावेळी उत्तर प्रदेश पूर्वच्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. तर, मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते शक्तीप्रदर्शनात उपस्थित आहेत.
...म्हणूनच वायनाडची केली निवड; राहुल गांधींनी उलगडले कोडे - Live Update
2019-04-04 12:45:51
वायनाड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखलकेल्यानंतर राहुल गांधींचे शक्ती प्रदर्शन
2019-04-04 13:28:32
भारत एकसंघ आहे हा संदेश देण्यासाठी मी केरळ येथे आलो आहे - राहुल गांधी
भारत एकसंघ आहे हा संदेश देण्यासाठी मी केरळ येथे आलो आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण काहीही असो. भारत एकसंघ आहे. केंद्र सरकार, मोदी आणि आरएसएस ज्या प्रमाणे दक्षिण भारतातील लोकांच्या भाषा आणि संस्कृतीवर हल्ला करत आहे. त्यांना हा संदेश देण्यासाठी मे येथून निवडणूक लढवणार आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सीपीआय आणि सीपीएमचे माझे मित्र माझ्या या निर्णयामुळे दुखी असतील. त्यावरुन ते माझ्या विरोधात बोलतील. मात्र, मी त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
2019-04-04 11:43:31
...म्हणूनच वायनाडची केली निवड; राहुल गांधींनी उलगडले कोडे
तिरुअनंतरपूरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी आज समर्थकांच्या मोठ्या ताफ्यासह ते वायनाड येथे दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर ते आपल्या मतदार संघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
राहुल गांधी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाड येथून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नव्यान प्राण फुंकण्यासाठी त्यांनी आपली आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकले आहेत. त्यासाठी त्यांनी आपला रथ दक्षिण भारताच्या दिशेने वळवला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
केरळमध्ये भाजपने भारत धर्म जनसेना पक्षाशी आघाडी केली आहे. या पक्षाचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही या ठिकाणी मजबुत स्थितीत आहे. राहुल गांधीच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्यावर ते नाराज दिसत आहेत. डाव्या पक्षांनी आघाडी करून वाम लोकतांत्रिक मोर्चा या नावाखाली पी. पी. सुनीर यांना मैदानात उतरवले आहे.