चेन्नई - तुतीकोरीनमध्ये पोलिसांच्या मारहाणीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर तामिळनाडूतील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून राहुल गांधींनी पीडित कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना संकटामुळे संथनकुलम येथे कुटुंबियांची वैयक्तीक भेट घेऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पक्षाच्या शक्ती संकेतस्थळावर संदेश जारी केला आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलन करुया असे, राहुल गांधी म्हणाले. जयराज आणि फिनिक्सच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोलिसांच्या कारवाईबद्दल मला वाईट वाटते. दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी 7 वाजता मेणबत्त्या पेटवा, असे राहुल गांधींनी तामिळनाडू काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.