नवी दिल्ली- देशामध्ये फेसबुक कंपनीसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यम कंपनी फेसबुक व व्हॉट्सअॅपबाबत तपास करण्याची मागणी केली आहे. देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याची कोणालाही परवानी असू नये, अशी गांधींनी अपेक्षा व्यक्त केली.
देशातील फेसबुकसह व्हॉट्सअॅपच्या कामाबाबत तपास करा, राहुल गांधींची मागणी - Rahul Gandhi slamms Facebook
राहुल गांधींनी पुन्हा एकदा फेसबुक कंपनीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देशाची एकता आणि सामाजिक एकतेवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपकडून हल्ला होत असल्याचे पितळ आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उघडे पाडले आहे.
राहुल गांधींनी पुन्हा एकदा फेसबुक कंपनीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देशाची एकता आणि सामाजिक एकतेवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपकडून हल्ला होत असल्याचे पितळ आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उघडे पाडले आहे. कोणत्याही विदेशी कंपनीला देशाच्याअंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याची परवानगी असू नये. त्याबाबतचा तातडीने तपास व्हावा. त्यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांना शिक्षा व्हावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. फेसबुक आणि भाजपमधील संबंध हे जवळचे राहिले आहेत, असा दावा करणारा अमेरिकन माध्यमातील वृत्ताचा दाखलाही राहुल यांनी ट्विटमध्ये दिला आहे.
व्हॉट्सअॅपला देशात देयक व्यवहार सेवा करण्याची परवानगी दिल्याने यापूर्वी काँग्रेसच्या नेत्याने केंद्र सरकारवर टीका केली होती. यापूर्वी काँग्रेसने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र पाठवून फेसबुकची भारतीय टीम ही पक्षपाती असल्याचे म्हटले होते. त्यासाठी अमेरिकेतील माध्यमाचा काँग्रेसने दाखला दिला होता.