नवी दिल्ली - सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय वैद्यकिय पात्रता परीक्षांबाबत (नीट) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. विद्यार्थी नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत, त्यांची 'मन की बात ऐका', असे गांधी यांनी सुनावले आहे.
येत्या १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई आणि १३ सप्टेंबरला नीट परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थे(एनटीए)ने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी करणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.