'एअर इंडिया, रेल्वेप्रमाणे मोदी ताज महाल आणि लाल किल्लाही विकून टाकतील'
'एअर इंडिया, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, उर्जा क्षेत्र सर्व मोदींनी विकून टाकले आहे, ते ताज महालही विकून टाकतील, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपच्या निर्गुंतवणूक धोरणावर टीका केली.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटचा टप्प्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत. काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी आज दिल्लीत आयोजित प्रचारसभेत भाजप आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केले.
'एअर इंडिया, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, उर्जा क्षेत्र सर्व मोदींनी विकून टाकले आहे, ते ताज महालही विकून टाकतील, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपच्या निर्गुंतवणूक धोरणावर टीका केली. भाजपने मेक इन इंडियाचा चांगला नारा दिला. मात्र, एकही कारखाना सुरू केला नाही. भारताचा युवक 'मेड इन इंडिया' करू शकतो का? असा प्रश्न संपूर्ण जगातून विचारला जात आहे. भारतातील आणि दिल्लीतील युवक 'मेड इन इंडिया' करू शकतो असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.