सिरसा - देशातील युवकांकडून नरेंद्र मोदींनी ३० हजार कोटी रुपये चोरुन अनिल अंबानींच्या बँक खात्यात टाकल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले. तसेच राफेलसंबधी आपण काय-काय केले ते जनतेला सांगा, असेही गांधी यावेळी म्हणाले.
मोदींनी ३० हजार कोटी रुपये चोरुन अनिल अंबानींच्या बँक खात्यात टाकले, राहुल गांधींचा निशाणा - bank
देशातील युवकांकडून नरेंद्र मोदींनी ३० हजार कोटी रुपये चोरुन अनिल अंबानीच्या बँक खात्यात टाकल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले. तसेच राफेलसंबधी आपण काय-काय केले ते जनतेला सांगा असेही गांधी यावेळी म्हणाले.
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
राजीव गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दल जरुर वक्तव्य करा, मात्र राफेलसंबधी काय केले ते सांगा, असे म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. त्यांचे काय झाले? असा सवालही राहुल गांधींनी यावेळी केला.