नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २३ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर आता टाळेबंदीचा पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यापासून लॉकडाऊनमधील शिथिलता वाढवण्यात आली. मात्र, हे लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख शेअर केलाय.
'लॉकडाऊन अयशस्वी', राहुल गांधींच्या ट्वीटमध्ये प्रगत देशांचे आलेख - rahul gandhi news
मोदी सरकारने राबवलेले लॉकडाऊन फेल झाल्याचे ट्वीट काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. याबाबत त्यांनी स्पेन आणि जर्मनीचा आलेख स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला असून त्यामध्ये इटली आणि ब्रिटनचा देखील समावेश आहे.
काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारने राबवलेले लॉकडाऊन फेल झाल्यासंबंधी ट्वीट केले आहे.
सध्या राहुल गांधी देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधत आहेत. यामार्फत ते विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तसेच केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावरही त्यांनी सुरुवातीपासून काही सूचना केल्या होत्या. यावेळीही त्यांनी लॉकडऊन फेल झाल्याचा दावा केला होता.