महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल, काँग्रेस 'अध्यक्ष' नसून 'सदस्य' - resignation

'मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नाही. पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यांनी आठवड्याभरात नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.

राहुल गांधी

By

Published : Jul 3, 2019, 10:48 PM IST

नवी दिल्ली - राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर आपल्या ट्विटर अकांटवरील प्रोफाइलमध्येही बदल केला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष असल्याची नोंद हटवली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्य एवढीच ओळख प्रोफाईलमध्ये ठेवली आहे. अखेर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यांनी आठवड्याभरात नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.

'मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नाही. पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.' मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये अशी काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर व्हायचा निर्णय घेतला होता.

राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांची त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरुन मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details