जयपूर - भाजपकडून राजस्थानमधील काँग्रेस सरकार अल्पमतामध्ये आणण्याचा कट केला जात असून, राज्यपाल कलराज मिश्रा यांनी लवकरात लवकर विधानसभा अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे. सरकारे बहुमताच्या जोरावर स्थापन केली जातात आणि जनतेसाठी चालवली जातात. मात्र, भाजप राजस्थानमधील 8 कोटी जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
"भाजपकडून राजस्थानच्या 8 कोटी जनतेचा अपमान"
भाजपकडून राजस्थानमधील काँग्रेस सरकार अल्पमतामध्ये आणण्याचा कट केला जात असून, राज्यपाल कलराज मिश्रा यांनी लवकरात लवकर विधानसभा अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे.
"भाजपकडून राजस्थानच्या 8 कोटी जनतेचा अपमान"
गांधी म्हणाले, “राज्यपाली कलराज मिश्रा यांनी तातडीने विधानसभा अधिवेशन बोलवावे आणि बहुमत चाचणी घ्यावी. त्यानंतर देशासमोर सत्य बाहेर येईल.” दुसरीकडे राज्यपाल मिश्रा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले की, अधिवेशनाबाबत मी काही तज्ज्ञांशी बोलण्याआधी इतक्या कमी कालावधीत दिलेल्या नोटिशीवर मी अधिवेशन बोलू शकत नाही.