पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. तर 7 नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेत, विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी लॉकडाऊन काळात लोकांची मदत केली नाही. आता त्यांच्याकडे मतदान मागण्यासाठी येत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. बिहारगंज येथील सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेस उमेदवार सुभाषिनी यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकतांत्रिक जनता दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुभाषिनी यादव या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी बिहारगंजमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी नितिश कुमार यांच्यावर टीका केली. राज्यातील तरुणांना नोकरी देण्याचे आणि बिहारचा विकास करण्याचे आश्वासन कुमार यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
मोदींचे खोटे आश्वासन -