नवी दिल्ली-देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. देशात १ नोकरी आणि १ हजार नागरिक बेरोजगार असून देशाचे काय केले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. देशातील वाढती बेरोजगारी दाखवण्यासाठी त्यांनी एका माध्यमाचा अहवाल आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
२० ऑगस्टला देखील राहुल गांधी यांनी देशातील रोजगारासंबंधी चर्चा केली होती. यात त्यांनी अधिस्थगन काळानंतर मोठ्या प्रमाणात लघू आणि मध्यम उद्योग बंद पडणार व त्यानंतर देशातील युवकांना रोजगार मिळणार नसल्याचे भाकित केले होते.