महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजप लोकशाही उद्ध्वस्त करतंय..! आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या अभियानात सहभागी व्हा' - #SpeakUpForDemocracy

ट्विटरवर राहुल गांंधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘सगळे एकत्र या, आणि लोकशाहीसाठी बोलते व्हा. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी तुमचा आवाज उठवा’, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. #SpeakUpForDemocracy हे अभियान काँग्रेसने सुरू केले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Jul 26, 2020, 1:24 PM IST

Updated : Jul 26, 2020, 2:12 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना लोकशाहीचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी #SpeakUpForDemocracy म्हणजेच 'लोकशाहीसाठी बोलते व्हा' हे अभियान सुरू केले आहे. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘सगळे एकत्र या, आणि लोकशाहीसाठी बोलते व्हा. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी तुमचा आवाज उठवा’, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

राहुल गांधी यांच्या आवाजातील हा व्हिडिओ आहे. भाजप आपल्या राज्यघटनेची मोडतोड करून असून लोकशाही उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच राजस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचे ते म्हणाले.

'आज संपू्र्ण जग कोरोना विरोधातील लढाई लढत असताना भाजप लोकशाहीची मोडतोड करत असून लोकशाही उद्ध्वस्त करत आहे. 2018 साली राजस्थानातील जनतेने काँग्रेसचे सरकार निवडून दिले. लोकशाही मार्गाने निवडूण आलेले सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. मध्यप्रदेशातही भाजपने हेच केेले. आता राजस्थानात भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे', असे राहुल गांधी म्हणाले.

‘लोेकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याचे भाजपने थांबवावे, ही आमची मागणी आहे. राज्यघटनेच्या हक्कानुसार सरकारने लगेच संसदेचे सत्र बोलवावे. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी ’स्पिकअप फॉर डेमॉक्रसी' या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

भाजप राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी कालही केला. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तर गेहलोत सतत पायलट यांच्यावर टीका करत आहेत.

Last Updated : Jul 26, 2020, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details