पाटना -बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे उद्या, 23 ऑक्टोबर रोजी महागठबंधनच्या पहिल्या सभेला संबाेधित करणार आहेत.
28 ऑक्टोबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी नवादा जिल्ह्यातील हिसुआ तसेच भागलुपरमधील कहलगांव येथे सभा आयाेजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी दिली. बिहारमध्ये महागठबंधन मजबूत असून यातील सर्व घटकपक्ष एकजुट आहे. तसेच कन्हैया कुमारच्या सभेतील सहभागाबाबत प्रश्न विचारला असता, तो या सभेत सहभागी होणार नसल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.