महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पंतप्रधानांनी उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'

प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी एका उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं', असे राहत इंदोरी म्हणाले.

राहत इंदोरी
राहत इंदोरी

By

Published : Feb 7, 2020, 8:56 PM IST

इंदोर -सुधारणा नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शहरातील बडवाली चौकी भागात आंदोलन सुरू आहे. बुधवारी प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांनी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'जर पंतप्रधानांनी संविधान वाचले नसेल. तर त्यांनी एका उच्चशिक्षीत व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं', असे राहत इंदोरी म्हणाले.

'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनंती करतो की, त्यांनी जर संविधान वाचले नसेल. तर एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला बोलवावे आणि त्याच्याकडून संविधानात काय लिहले आहे आणि काय नाही हे समजून घ्यावे', असे राहत इंदोरी म्हणाले.

'पंतप्रधानांनी उच्चशिक्षीत व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'

प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या 'लाजिम है कि हम भी देखेंगे' ही कविता वादग्रस्त आहे का हे ठरवण्यासाठी आयआयटी कानपूरने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यावरूनही राहत यांनी टीका केली. फैज यांच्या कवितेचा अर्थ बदल्यानंतर मला विशेष काही वाटले नाही. कारण, त्यांच्या कवितेला देशविरोधी म्हणाऱ्यां लोकांना हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषेचे ज्ञान नाही, असे राहत म्हणाले.

हेही वाचा -कोरोना विषाणू : 'वूहानमध्ये अद्याप 80 भारतीय विद्यार्थी'

ABOUT THE AUTHOR

...view details