बंगळुरू - नजीकच्या अण्णासांद्रापाल्यातील एचएएल परिसरात एका पिसाळलेल्या बैलाने दोन नागरिकांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरप्पा आणि सेल्वाकुमार अशी जखमीची नावे आहेत. बैल अण्णासांद्रापाल्या व शास्त्रीनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी रस्ता परिसरातील एका दुकानात बसलेल्या गुरप्पा व सेल्वाकुमार या दोघांना बैलाने जबर धडक दिली. यात गुरप्पा हा जागेवरच बेशुद्ध झाला. इतकेच नव्हे तर, बैलाने त्याच्या शरिराला आपल्या शिगांनी धडकाही दिल्या. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे.