राजकीय फायद्यासाठी लष्कराचं हित बाजूला सारणे योग्य नाही - माजी हवाई दल प्रमुख
राफेल विमान खरेदी कथित घोटाळ्यासंदर्भातील पुनर्याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज(गुरुवारी) फेटाळून लावली. यावर हवाई दलाचे माजी प्रमुख बी. एस धानोवा यांनी समाधान व्यक्त केले.
माजी हवाई दल प्रमुख
नवी दिल्ली - राफेल विमान खरेदी कथित घोटाळ्यासंदर्भातील पुनर्याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज(गुरुवारी) फेटाळून लावली. यावर हवाई दलाचे माजी प्रमुख बी. एस धानोवा यांनी मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिल्यानंतर ते बोलत होते.
राफेल प्रकरण एकदाचे संपले. लष्कराचे हित बाजूला सारुन राजकीय फायद्यासाठी असे विषय पुढं आणणे बरोबर नाही. न्यायालयाच्या निकालामुळे आम्हाला न्याय मिळाला. डिसेंबर २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचे मी सांगितले होते. मात्र, माझ्यावर राजकीय दृष्टीने मत व्यक्त केल्याचा आरोप करण्यात आला होता, असे धानोवा म्हणाले.
फ्रेंच कंपनी 'दसॉल्ट एव्हिएशन'कडून 'राफेल' लढाऊ विमान खरेदी प्रकरणात केंद्र सरकारला न्यायालयाने क्लीन चिट दिली. या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.