महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#बॅटलग्राउंडयूएसए 2020 : ईटीव्ही भारतची अमेरिकेतील दोन प्रमुख पॅनेलिस्टसोबत वंशवादाच्या प्रश्नांवर विशेष चर्चा - #BattlegroundUSA2020

ट्रम्प येत्या नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करत असल्याने, स्थलांतर आणि वंशवाद हे दोन्हीही प्रश्न निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अमेरिका वर्णद्वेषी आहे का ? की सिस्टमिक वर्णद्वेष 2020 मध्ये सामाजिक आणि राजकीय मत- मतांतरे बनवत आहे? याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी #बॅटलग्राउंडयूएसए2020 च्या दुसर्‍या पर्वात अमेरिकेतील दोन प्रमुख पॅनेलिस्टसोबत वंशवादाच्या प्रश्नांवर चर्चा केली.

#बॅटलग्राउंडयूएसए 2020
#बॅटलग्राउंडयूएसए 2020

By

Published : Aug 27, 2020, 4:39 PM IST

फ्रान्सिस फुकुयामा (Francis Fukuyama) यांनी आपल्या ‘आयडेंटिटी’ या पुस्तकात 2018 साली असा युक्तिवाद केला होता की, स्थलांतरामुळे मोठ्या प्रमाणात वर्ग आणि वंश विस्थापित झाले. हेच मुळ कारण होते, ज्यामुळे अमेरिकन लोकांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान केले. यासाठी त्यांनी राजकीय शास्त्रज्ञ हजनल (Hajnal) आणि अब्राजानो (Abrajano) यांच्या तपशीलाचा हवालाही दिला होता.

ईटीव्ही भारतची अमेरिकेतील दोन प्रमुख पॅनेलिस्टसोबत वंशवादाच्या प्रश्नांवर विशेष चर्चा

“1960 च्या दशकातील नागरी हक्कांच्या चळवळीनंतर आफ्रिकन- अमेरिकन लोकांचा मोठ्या प्रमाणात डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये समावेश करण्यात आला. यामुळेच दक्षिणेकडील भागात रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव सर्वात जास्त वाढला होता. आजचे स्थलांतरही अशीच काहीशी भूमिका पार पाडत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मेक्सिकन आणि मुस्लिम स्थलांतरितांचा जोरदार विरोध केल्यानेच त्यांची अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची दारं खुली झाली. ” असे फुकुयामा यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. (पान- १३२)

ट्रम्प येत्या नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करत असल्याने, स्थलांतर आणि वंशवाद हे दोन्हीही प्रश्न निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रिपब्लिकन नेशन कंन्वेंशनच्या पहिल्या रात्री, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत आणि दक्षिण कॅरोलिनाचे माजी गव्हर्नर निक्की हेली (Nikki Haley) त्यांनी कृष्णवर्णीय महिला कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीची उमेदवारी निश्चित केली.

हेली आणि हॅरिस या दोघींचा जन्म स्थलांतरित पालकांपासून झालेला असून त्या दोघीही भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात आता ‘अमेरिका हा वर्णद्वेषी आहे’ असे म्हणणे फॅशनेबल झाले आहे. पण यात काही तथ्य नाही. कारण, अमेरिका हा वर्णद्वेषी देश नाही. हे माझ्यासाठी वैयक्तिक आहे. मी भारतीय स्थलांतरितांची एक स्वाभिमानी मुलगी आहे, ” असेही हेली यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी प्रतिनिधींसमोर त्यांच्या वडिलांनी पगडी घातलेल्या व तिच्या आईने साडी नेसल्याच्या आठवणीही ताज्या केल्या.

“अमेरिका ही एक कथा आहे, जी सध्या प्रगतीपथावर आहे. त्या प्रगतीपथावर आपल्याला जास्तीत जास्त काम करण्याची आणि अमेरिकेला अजून मुक्त, प्रामाणिक आणि प्रत्येकासाठी अधिक चांगला देश बनवण्याची आता वेळ आली आहे. त्यामुळेच डेमॉक्रॅटिक पक्षाने दंगली व चिथावणीखोरी सारख्या घटनांकडे डोळेझाक केली. कारण अमेरिकेत अशा घटना घडणं फारचं दुःखद आहे,” असेही हेली पुढे म्हणाल्या.

तर मग अमेरिका वर्णद्वेषी आहे का ? की सिस्टमिक वर्णद्वेष 2020 मध्ये सामाजिक आणि राजकीय मत- मतांतरे बनवत आहे? याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी #बॅटलग्राउंडयूएसए2020 च्या दुसर्‍या पर्वात अमेरिकेतील दोन प्रमुख पॅनेलिस्टसोबत वंशवादाच्या प्रश्नांवर चर्चा केली.

समाजशास्त्राचे प्राध्यापक, द्वेषपूर्ण गुन्हे संशोधक आणि कादंबरीकार डॉ. रॅन्डल ब्लाझक (Randal Blazak) म्हणाले की, वर्णद्वेषाच्या मुद्द्यांबाबत अमेरिकेत सध्या राष्ट्रीय मोजमाप करण्याचे काम सुरु आहे. “अमेरिकेत वर्णद्वेषाचा प्रश्न सोडवताना आम्ही खुपच हलगर्जीपणा केला आहे. तसेच सर्वांगीण वर्णद्वेषाबाबत तिथे गेल्या शेकडो वर्षांपासून कसली समेटही भरवली गेली नाही. म्हणून किमान 2020 मध्ये तरी या संवादाला वाचा फुटली आहे. कदाचित यामध्ये कोरोना महामारीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु खरचं शेवटी वर्णद्वेषावर संवाद व्हायला सुरुवात होत आहे. हा संवाद प्रामुख्याने गौरवर्णीय लोकांकडून होत आहे. जे आपण प्रत्यक्षात याचा कसा सामना कसा करतो ? हे शोधण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.” असे डॉ. ब्लाझक म्हणाले. जे गोऱ्या वर्चस्वाचा इतिहास असलेल्या ओरेगॉन येथील पोर्टलँडवरून बोलत होते.

निक्की हेली जेव्हा अमेरिका वर्णद्वेषी नसल्याचा युक्तिवाद करत होत्या, तेव्हा विस्कॉन्सिन येथील केनोशाच्या रस्त्यावरील जाळपोळ व हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड्स गस्त घालत होते. एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने 29 वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्ती जेकब ब्लेक याच्यावर, त्याच्या तीन लहान मुलांसमोर गोळी घातल्यामुळे सध्या तिथे अशांतता वाढली आहे. यामुळे या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सक्तीच्या प्रशासकीय रजेवर पाठवण्यात आले. ब्लेक या गोळीबारातून बचावले. परंतु तीन महिन्यांपूर्वी मिनीयापोलिसमध्ये कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूच्या निंदनीय घटनेनंतर, देशभरात झालेल्या #Blacklivesmatter या निषेध अंदोलनाला या घटनेच्या रुपात पून्हा एकदा हवा मिळाली आहे.

यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये वर्णद्वेष आणि कृष्णवर्णीयांच्या हत्या हा राजकीय भाषणांचा आणि प्रचाराचा एक भाग होता. परंतु यावेळी हा सर्वांगीण वर्णद्वेष हा राष्ट्रीय संवादाचा भाग आहे, असा युक्तीवाद रिलिजिअस फ्रिडम इंस्टिट्युट्स आणि विल्सन सेंटरचे ज्येष्ठ संशोधन सदस्या फरहाना इस्पहानी (Farahnaz Ispahani) यांनी केला.

वॉशिंग्टन डी.सी. येथून या चर्चेत सहभागी झालेल्या इस्पहानी म्हणाल्या की, “ वर्णद्वेष घालवण्याबाबत आपण यापूर्वीही बोललो आहोत. मग ती घटनेच्या, गुलामगिरी किंवा नागरी हक्क चळवळ किंवा मार्टिन ल्यूथर किंग यांच्या माध्यमातून असो. असे नाही की, आपण अमेरिकेत वंशवादाबद्दल कधीही बोललो नाहीत किंवा याबद्दल गंभीर चर्चा केली नाही. असंही नाही की, यापूर्वी पोलिसांनी बर्‍याच लोकांना गोळ्या घातल्या नव्हत्या. परंतु यावेळी मात्र अमेरिकेच्या इतिहासाचा, भूगोलाचा भाग म्हणून प्रथमच सर्वांगीण वंशवाद समोर आणला जात आहे. आज अमेरिका काय आहे आणि नेहमीपासून अमेरिका काय होती. हाच काही तो फरक आहे,” असे श्रीमती इस्पहानी यांनी सांगितले.

“पहिल्यांदाच एका मोठ्या अमेरिकन राजकीय पक्षाने (डेमोक्रॅट्स) सर्वांगीण वर्णद्वेषाबद्दल चर्चा केली आहे. आज ही गोष्ट आपण राजकीय वर्तुळात नाकारू शकतो किंवा मान्य करू शकतो. परंतु राजकीय वर्तुळ, राजकारणी, माध्यमे आणि अमेरिकन लोक यांच्याद्वारे ही गोष्ट अमेरिकेत सर्वत्र पसरली आहे. यावर लोकांचीही मत असायलाच पाहिजे. मग ते कोणत्याही बाजूची असली तरी चालतील. त्यामुळे काही झाले तरी, त्यांना या प्रश्नाला सामोरे जावेच लागणार आहे,” असेही श्रीमती इस्पहानी पुढे म्हणाल्या.

असे असले तरी, रिपब्लिकनांनी डेमोक्रॅट्सना त्यांच्या प्रचारात कट्टर डावे, वामपंथी आणि ब्लॅक लाईव्हज कार्यकर्ते आणि निदर्शकांच्या रुपातील हिंसक लिंचिंग टोळ्या असे संबोधले आहे. तसेच ‘डीसीतील दलदल’ काढून टाकण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. तर या चर्चेत स्मिता शर्मा यांनी विचारले की, सिस्टमिक वंशवादावरील राष्ट्रीय चर्चेमुळे अमेरिकन लोकांचे ध्रुवीकरण होऊ शकेल का? किंवा यामुळे गोरे पुराणमतवादी अमेरिकन लोकं एकत्र येतील का ? त्याचबरोबर ट्रम्प- पेन्स यांच्या तुलनेत वंशवादाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी ठोस उपाय किंवा वेगळी योजना बायडेन- हॅरिस यांच्याकडे आहे का?

“ खरं म्हणजे या आठवड्यात रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये आपण जे काही पाहिले, ते फार विभाजनवादी होते. जिथे एक भीतीची पार्टी आहे आणि दुसरी प्रतिबिंबित पार्टी आहे. अमेरिका हे एक सतत बदलणारे ठिकाण आहे. आताआपण अधिक गव्हाळवर्णीय (ब्राऊन) देश बनत चाललो आहोत. असे होण्यापासून थांबवणे आपल्यासाठी कठिण आहे. त्यामुळे आपल्याला याच्या विरोधात जाऊन आपण पुशबॅकमध्ये सामील व्हावे लागेल.

‘उपनगरीय गृहिणी मला मतदान करतील. कारण मी त्या लोकांना तुमच्या शेजारून हाकलून देणार आहे,’ असे राष्ट्राध्यक्षांनी ट्वीट करणे, जे 1950 च्या दशकातील असल्याचे दर्शवते. म्हणून केवळ सध्याच्या धोरणांबद्दलच नव्हे, तर या क्षणी आपण स्वतः बद्दल कसा विचार करत आहोत, यातही वास्तविक फरक आहे, असे डॉ. ब्लाझक म्हणाले.

वयस्कर आणि तरुण अमेरिकन लोकं वांशिक अन्याय प्रकरणांवरुन विभागले गेले आहेत का? असे विचारले असता डॉ. ब्लाझक म्हणाले की, “आम्हाला वास्तविक पिढीतील फरक ठळक दिसतो. अमेरिकन जनगणना ब्युरोने असा अंदाज वर्तवला आहे की, सन 2050 पर्यंत अमेरिकन गोऱ्या लोकांची टक्केवारी नॉन-व्हाईट लोकांपेक्षा कमी असेल. तेव्हा हा देश बहुसंख्य लोकांचा अल्पसंख्याक देश बनेल.

हा विषय तरुण लोकांसह बर्‍याच लोकांसाठी खदखदणारा ठरत आहे. आणि काही जुन्या गोऱ्या लोकांना त्यांच्या देशातच याची जास्त भीती वाटायला लागली आहे. त्यांना असे वाटते की, 1776 साली त्यांनी याठिकाणी काहीतरी तयार केलेले, आता कोणीतरी त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत. त्यामुळे ते आता भिंत बांधण्याच्या अत्यंत बचावात्मक स्थितीत आहेत. स्थलांतरितांवर बंदी आणणे किंवा कसे तरी काळाला मागे खेचत पून्हा एकदा गोऱ्या पुरुषांचा देश बनवून पौराणिक भूतकाळाकडे परत जाऊ इच्छित आहेत. जिथे ट्रान्सजेंडर लोक किंवा स्थलांतरित लोक किंवा मुस्लिम किंवा इतर कोणत्याही देशाची व्यक्तींना त्यांना आजच्या सारखे आव्हान दिले नव्हते. जे आजच्या घडीला बहुसंख्य गोऱ्या लोकांना आव्हानात्मक ठरत आहेत.

“मी जवळजवळ 35 वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो. तेव्हा मी केवळ 18 वर्षांचा होतो. त्या वेळचा अमेरिका खूपच वेगळा होता. तेव्हा तिथे स्थलांतरितांचे आनंदाने स्वागत केले जायचे. पण आमच्यातले बहुतेकजण त्यावेळी अभ्यासाच्या निमित्ताने किंवा सुशिक्षित कुटुंबांतील लोक अमेरिकावारी करायचे. आता स्थलांतरितांची पद्धतही बदलली आहे , त्यामुळे स्वागताची पद्धतही बदलली आहे. परंतु आता पिढ्यान पिढ्या आपण जे पाहत आहेत, ते खूप भयानक बनत चालले आहे.

आपण काही वृद्ध लोकं पाहिली असतील. जे आपली जीवनशैली, त्यांचा देव, त्यांची चर्च, त्यांची जमीन- जुमला गमावून बसल्यानंतर, ते खूप घाबरलेले असतात. आणि या बदलत्या घडामोडीचा ते सामनाही करू शकत नाहीत. अशा घाबरलेल्या बऱ्याच लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले आहे. त्यामुळे हे सकारात्मक मत नव्हते, असे फरहाना इस्पहानी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक स्थलांतरित म्हणुन त्यांच्या आठवणीही सांगितल्या. यांनी सध्या पाकिस्तानमध्ये कायमचे वास्तव्य स्विकारले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details