नरेंद्र मोदी 'जल्लाद' तर नितीशकुमार 'नाल्यातील किडा', राबडी देवींची जीभ घसरली - bjp
'प्रियांका यांनी मोदींना दुर्योधन म्हटले ते चुकीचे केले. त्यांना जल्लाद म्हणणे योग्य ठरेल. ते न्यायाधीश आणि पत्रकारांना मारून टाकणारे आणि कायमचे आयुष्यातून उठवणारे 'जल्लाद' आहेत. अशा माणसाचे मन आणि विचार किती भयंकर असतील,' असे त्या म्हणाल्या.
नवी दिल्ली - बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेत्या राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना 'जल्लादा'शी केली. तर, जनता दलाचे काहीजण 'नाल्यातल्या किड्यासारखे' आहेत, असे त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधींनी मोदींना दुर्योधनाची उपमा दिल्यानंतर राबडीदेवींनी हे वक्तव्य केले आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी प्रियांका यांनी मोदींना दुर्योधन म्हटले ते चुकीचे केले, असे म्हटले. 'यापेक्षा त्यांना जल्लाद म्हणणे योग्य ठरेल. ते न्यायाधीश आणि पत्रकारांना मारून टाकणारे आणि कायमचे आयुष्यातून उठवणारे तसेच, गायब करून टाकणारे 'जल्लाद' आहेत. अशा माणसाचे मन आणि विचार किती भयंकर असतील,' असे त्या म्हणाल्या.
याशिवाय, त्यांनी भाजप आणि जदयूवरही हल्ला चढवला. या पक्षांमधील लोक 'नाल्यातले किडे' आहेत. 'मोदींची भाषा अशाच प्रकारची आहे. भाजप आणि जदयूतले सगळेच नाल्यातले किडे आहेत. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये ते विकासाचे नाव सांगत आले होते. प्रत्यक्षात विनाश करून निघाले आहेत,' असे त्या म्हणाल्या.