नवी दिल्ली-केंद्र सरकारने दारूच्या दुकानांना सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी दिली. त्यामुळे तळीरामांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले असून तळीराम मद्यविक्री दुकानाबाहेर रांगा लावत आहेत. दिल्लीतील कश्मीरी गेट जवळ दारूच्या दुकानासमोर चक्क दोन किलोमीरची रांग लागली होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवू तळीरामांनी याठीकाणी गर्दी केली. त्यामुळे लाठीचार्च करुन पोलिसांना तळीरामांना घरी पाठवावे लागले.
दिल्लीत तळीरामांची भली मोठी रांग... पोलिसांनी केला लाठीचार्ज
लाॅकडाऊन दरम्यान दारू दुकाने बंद होती. मात्र, केंद्र सरकारने दारूचे दुकाने सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे दारूच्या दुकानाबाहेर तळीराम गर्दी करताना दिसत आहेत. प्रशासनाने सांगूनही मद्य दुकनाबाहेर नियमांचे पालन होत नाही. दुकानांबाहेर गर्दी होत आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन ३.० : देशातील विविध भागांमध्ये दारु विक्री सुरू; दुकानांबाहेर पहाटेपासूनच लागल्या रांगा..
लाॅकडाऊन दरम्यान दारू दुकाने बंद होती. मात्र, केंद्र सरकारने दारूचे दुकाने सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे दारूच्या दुकानाबाहेर तळीराम गर्दी करताना दिसत आहेत. प्रशासनाने सांगूनही मद्य दुकनाबाहेर नियमांचे पालन होत नाही. दुकानांबाहेर गर्दी होत आहे. दिल्लीतील काश्मीरी गेटजवळ तर सोशल डिस्टन्सिंचे नियम धाब्यावर बसवून तळीरामांनी दुकानाबाहेर दोन किमीची रांग लावली. पोलिसांना याची माहिती मिळताच येथील तळीरामांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्स लाठीचार्ज करावा लागला. मात्र, या प्रकारानंरतर परिसरातील मद्याची दुकाने पोलिसांनी बंद केली आहेत.