जयपूर - राजस्थानातील जमवारमढच्या बिरासना ग्रामपंचायत हद्दीत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मृत व्यक्ती अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यामुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी विविध गावातील 200 लोक उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.
अंत्यसंस्कारानंतर समजले मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; राजस्थानात कोरोना संक्रमणाचा वाढला धोका बिरसाणा ग्रामपंचायतीतल रामनगर येथील वयोवृद्ध व्यक्तीला पित्ताशयाचा त्रास होता.त्यामुळे उपचार करण्यासाठी 13 एप्रिल रोजी जयपूरमधील एसएमएस रुग्णालायत दाखल केले होते. 17 एप्रिलला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती यानंतर 21 एप्रिल रोजी त्या व्यक्तीचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. आणि 22 एप्रिल रोजी मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्थानिक प्रशासनाला समजले. यानंतर पुर्ण रामनगर सील करण्यात आले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबासह अंत्यसस्कारात सहभागी सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. रामनगरच्या सर्व सीमांवर पोलिसांना नाकाबंदी केली आहे. संपूर्ण गाव सॅनिटाईझ करण्यात आले आहे. मृत व्यक्तीच्या घराजवळ राहणाऱ्यांना देखील विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. संपूर्ण विधानसभा मतदारंसघात पोलीस स्पीकरवरून घोषणा देत अंत्यसस्कार कार्यक्रमात सहभागी असणारांना समोर येण्याचे आवाहन करत आहेत.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार इतर गावातील व्यक्तीदेखील अंत्यसंस्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रशासन त्यांची माहिती गोळा करत आहेत. गावकऱ्यांच्या मते अंत्यसंस्काराला 200 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. मात्र, ही संख्या कमी असावी असा प्रशासनाचा अंदाज आहे. प्रशासनाकडून याची माहिती घेतली जात आहे.