महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगातील सर्वात कठीण रेस्क्यू ऑपरेशन; ७ विदेशी गिर्यारोहकांचे मृतदेह पिथौरागड येथे आणले - विदेशी पर्वतारोही

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) शोधून काढलेल्या सर्व गिर्यारोहकांचे मृतदेह पिथौरागढ येथे आणले आहेत. येथून मृतदेह शवविच्छेदनासाठी हल्द्वानी येथे पाठवण्यात येणार आहेत. समुद्रसपाटीपासून २१ हजार फुटांवर हे मृतदेह सापडले होते.

जगातील सर्वात कठीण रेस्क्यू ऑपरेशन

By

Published : Jul 3, 2019, 1:30 PM IST

पिथौरागड - इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) शोधून काढलेल्या सर्व गिर्यारोहकांचे मृतदेह पिथौरागढ येथे आणले आहेत. येथून मृतदेह शवविच्छेदनासाठी हल्द्वानी येथे पाठवण्यात येणार आहेत. समुद्रसपाटीपासून २१ हजार फुटांवर हे मृतदेह सापडले होते.


१३ मे रोजी ब्रिटनचे नागरिक मार्टिन मोरिन, रिचर्ड प्याने, रूपर्ट वेवेल, जोन चार्लीस मॅकलर्न, अमेरिकेचे रोनाल्ड बीमेल, अॅन्थोनी सुडेकम, ऑस्ट्रेलियाची महिला गिर्यारोहक रुथ मॅकन्स आणि आयएमएफचे लायजनिंग ऑफिसर चेतन पांडेय हे मुनस्यारी येथून नंदा देवी ईस्टला निघाले होते. २६ मे रोजी हे पथक अॅव्हलांचच्या तडाख्यात सापडल्याने बेपत्ता झाले होते. या पथकातील ७ जणांचे मृतदेह सर्च अॅण्ड रेस्क्यू टीमने शोधून काढले आहेत. तर एका गिर्यारोहकाचा शोध लागत नाहीये.


आयटीबीपीच्या द्वितीय कमांडचे अधिकारी आणि एव्हरेस्ट विजेता रतन सिंह सोनाल यांच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यीय टीमने नंदा देवी ईस्ट येथे हरवलेल्या ८ गिर्यारोहकांपैकी ७ जणांचे मृतदेह २३ जूनला शोधून काढले होते. सर्व मृतदेह १७ हजार ८०० फुटांवर असलेल्या अॅडव्हान्स कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. प्रत्येक मृतदेहाचे वजन ८० ते ९० किलोंच्या आसपास होते. सर्व मृतदेह कॅम्पपर्यंत आणण्यासाठी आयटीबीपीच्या हिमवीरांना अत्यंत खडतर परिश्रम घ्यावे लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details