नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 50 लाखांपर्यंत वाढविली आहे. 21 वर्षांपासून सुरू असलेल्या नियमात त्यांनी बदल केला आहे. लडाखमधील गालवण खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत पंजाबचे चार सैनिक हुतात्मा झाले. गुरुवारी दोन हुतात्मा सैनिकांना अंतिम निरोप देण्यात आला. तर आज दोन हुतात्म्यांचा अंतिम संस्कार होईल.
पंजाब सरकारने बदलला 21 वर्ष जुना नियम; हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देणार 50 लाख
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 50 लाखांपर्यंत वाढविली आहे. 21 वर्षांपासून सुरू असलेल्या नियमात त्यांनी बदल केला आहे.
राज्य सरकारने गुरुवारी रात्री हा निर्णय घेतला. सरकारने हुतात्मा कुटुंबीयातील एका सदस्याला नोकरी आणि 10 ते 12 लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय 1999 मध्ये घेतला होता. आता वेळ बदलली आहे. म्हणून त्यात बदल करण्याची गरज आहे. 10 लाखांची मदत खूप कमी आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 50 लाखांपर्यंत वाढविली असून कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही देण्यात येईल. तसेच इतर सुविधाही पुरवण्यात येतील, असे ते म्हणाले.
पूर्व लडाखच्या गाळवण खोऱ्यात चिनी सैन्यांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत पंजाबचे चार सैनिक शहीद झाले. तोलेवाल गुरबिंदर सिंग, सतनाम सिंग, मनदीप सिंग, गुरतेज सिंग यांचा समावेश आहे.